अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल; पकडण्याचे मोठे आव्हान
मोताळा: चोरटे राहून-राहून आपले नेटवर्क सक्रीय करीत चोरींच्या घटनांना अंजाम देतात. चोरट्यांनी परत ॲक्शन मोडवर येत, ऐन दिवाळीच्या मोसममध्ये मोताळा-नांदुरा रोडवरील, नांदुरा अर्बन समोरुन महिंद्रा स्वराज कंपनीचे 3 लाख 80 हजाराचे ट्रॅक्टर लंपास केल्याची घटना 4 ते 5 दिवसापुर्वी घडली होती. याबाबत आज 14 ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
झाले असे की, शेख अलीम शेख जलील रा.बोराखेडी यांनी आपले महिंद्रा कंपनीचे स्वराज 742 ट्रक्टर क्र. एम.एच.-28 सी.सी.- 2009 नांदुरा रोडवरील, नांदुरा अर्बन समोरील रोडवर 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता उभे केले होते. ते 9 ऑक्टोबर रोजी सकाळी उभे दिसले नाही. ट्रॅक्टरचा शोध घेतला परंतु ते आढळून आले नसल्याने आज 14 ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिसांत महिंद्रा कंपनीचे 3 लाख 80 हजाराचे ट्रॅक्टर चोरीला गेल्याची फिर्याद दिली. बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. यापूर्वी देखील मोताळा शहरात चारचाकी, दुचाकी वाहने चोरीला गेली असून त्यांचा शोध लावण्यात पोलिस अपयशी ठरले असल्याने ट्रॅक्टर चोरट्याला पकडण्याचे बोराखेडी पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.