साल्याने जावायाला ‘त्याच्याच’ घरी झोडपले !

6

मोताळा: साल्याने जावायाला बहिणास त्रास देतो, मारहाण करतो या कारणावरुन शिविगाळ करीत बहिणीच्या नवऱ्याला त्याच्याच घरी काठीने मारहाण केल्याची घटना धा.बढे पोलिस हद्दीत असलेल्या शेलगाव बाजार येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या फिर्यादीच्या साल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शेलगाव बाजार येथील कपील दिलीप पाटील यांनी धा.बढे पोलिसांत दिलेल्या फिर्याद दिली, त्यांचे सन 2013 मध्ये लग्न झाले आहे. त्यांना दहा वर्षा एक व चार वर्षाची अशा दोन मुली आहे. पती-पत्नी मागील आठ वर्षापासून वेगवेगळे राहतात. फिर्यादीची पत्नी अधून-मधून फिर्यादीच्या घरी शेलगाव बाजार येते. फिर्यादीची पत्नी मिनाक्षी पाच दिवसापासून फिर्यादीच्या घरी राहत आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता फिर्यादीचा सावरगाव जहागिर येथील साला गणेश देवगीर गिरी हा आला.

बहिण मिनाक्षीला मारहाण का केली? तू तिला चांगले वागवित नाही, असे म्हणून वाद घालीत शिविगाळ करु लागला. फिर्यादीने गणेशला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिविगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. व काठीने डोक्यावर मारुन जखमी केल्याच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोलिसांनी गणेश देवगीर गिरी याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 115(2), 118 (1), 351 (2),352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.