गुजरातला ‘अच्छे दिन’ महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातमध्ये! प्रकल्प गुजरातला गेलाच कसा ?; राज ठाकरे संतप्त

264

मुंबई(BNU न्यूज)- वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न विचारला असून हे लक्षण महाराष्ट्रासाठी चांगले नाही.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न राज ठाकरे विचारीत असून सदर प्रकार गंभीर असून विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होते, अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही,असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात तिप्पट गुंतवणूक आणण्याची ताकद- ना.उयय सामंत
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरका रवर जोरदार टीका होत आहे. यावर प्रतिक्रीया देत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, राज्यातून एक कंपनी गेली असली  तरी त्यापेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची ताकत असल्याचेही ते म्हणाले.

 

स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके- आदित्य ठाकरे
वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टिकेचा बाण सोडत, वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झाले असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल करीत स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असे हे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला असून गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हीत जपण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?” असा सवाल जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला केला आहे.