शिवसेनेच्या नेतेपदी खा.प्रतापराव जाधव यांची निवड

137

बुलडाणा ((BNU न्यूज)- शिवसेनेच्या नेतेपदी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशान्वये एका नेतेपदी निवड केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक 12 सप्टेंबर रोजी बोलवण्यात आली होती. या बैठकीदरम्यान शिवसेना नेते आणि उपनेतेपदी नियुक्त जाहीर करण्यात आल्या. यामध्ये केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली होती. पहिल्यांदा मेहकर तालुका खरेदी संघाचा अध्यक्ष झाले. 1992 मध्ये बुलडाणा जिल्हा परिषदेचे सदस्य पासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात कृषी सभापती, विरोधी पक्षनेता अशा भूमिका यशस्वी रित्या पार 1990 शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणुन काम करत जिल्ह्यात शिवसेनेच्या 100 शाखेची स्थापना केली. सलग तीन वेळा मेहकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

  • भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांनी काम केलं. त्यानंतर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले असून सध्या केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शिवाय शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, सपर्कप्रुख म्हणून त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी पक्षाच्या वतीने सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी खासदार प्रतापराव जाधव यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एका आदेशान्वये निवड केली आहे.