मुलाला वाचवितांना पित्याचाही शॉक लागून मृत्यू! उस्मानाबाद जिल्ह्यातील खडकी ता.तुळजापूर येथील घटना

183

तुळजापूर (BNUन्यूज) मुलाला विजेचा शॉक लागत होता, हे दृष्य पाहून वडिलांनी धाव घेतली. परंतु विजेचा शॉक एवढा जबरदस्त होता की, बाप लेकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना तुळजापूर तालुक्यातील खडकी या गावत आज 25 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली. वडीलाचे नाव सचिन भंडारे व मुलाचे नाव जय भंडारे असे आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील 11 वर्षीय जय भंडारे हा मुलगा घरावर कपडे वाळू घालण्यासाठी गेला होता. कपडे वाळवण्यासाठी टाकतांना जयला महावितरणच्या सर्व्हीस वायरचा जोरदार धक्का लागल्याने तो मोठ्या किंचाळला, मुलाचा आवाज ऐकून वडील सचिन भंडारे धावत गच्चीवर गेले, मुलाचा हात भाजत असल्याचे त्यांना दिसताच त्यांनी मुलगा जयला बाजुला करण्याचा प्रयत्न केला. परंतु विजेचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही पिता-पूत्र जोरात शॉक लागल्याने घरावरुन खाली कोसळले. खडकी गाव हे सोलापूर शहरापासून जवळच असल्याने जखमी अवस्थेत बाप लेकाला उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून 35 वर्षीय पिता सचिन भंडारे व 11 वर्षीय जय सचिन भंडारे यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे खडकी गावाकर शोककळा कोसळली आहे.