तळणी येथे लंपी आजाराने गाईचा मृत्यू

205

गणेश वाघ..
तळणी (BNUन्यूज)- मोताळा तालुक्यातील तळणी येथे गेल्या अनेक दिवसांपासून लंपी आजाराने थैमान घातले आहे. २५ सप्टेंबर रोजी शेतकरी बाळकृष्ण शंकर नाफडे यांच्या गाभण गायीचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बाळकृष्ण नाफडे यांची नऊ महिन्याची गाभण गाय काही दिवसांपासून आजारी होती. सदर गायीवर डॉ.टेकाडे यांनी उपचार केले होते. परंतु उपचाराचा कु’लाही फायदा झाला नाही, अशातच २५ सप्टेंबर रोजी सदर गाईचा लंपी आजाराने मृत्यू झाला. यामुळे शेतकरी बाळकृष्ण नाफडे यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेलापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ.सरदार यांनी घटनास्थळावर भेट देऊन सदर गाईचा पंचनामा करून सदर गाय ही लंपी आजाराने मृत पावल्याचे घोषित केले. इतरही ८ ते ते १० जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाल्याने तळणी परिसरात पशु पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुपालक आर्थिक अडचणीत आले आहेत. शासनस्तरावरुन नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरी व पशुपालक मालकांकडून होत आहे. तसेच सदर पशुवैद्यकीय स्तरावरुन गावात प्रत्येक वाळ्यांची धूर फवारणी करावी, अशी मागणी तळणीसह परिसरातून होत आहे.