व्हीडीओ मिक्सींग करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखाविल्या; ६ जणांवर गुन्हा दाखल!

425

मोताळा (BNU न्यूज)एप्रिल महिन्यात राम नवमीला निघालेली रॅली व ९ ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील व्हीडीओ मिक्सींग करुन मोताळ्यातील एका विशिष्ट समाजातील युवकांनी सोशल मिडीयावर प्रसारीत करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखाविल्या प्रकरणी ६ आरोपींवर बोराखेडी पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर वाघ, रविंद्र पाटील, विठ्ठल पन्हाळकर, संजय धोरण, मंगेश बगाडे, सुमित सोनुने, सुरज देशमुख व मोताळा शहरातील असंख्य हिंदु नागरिकांनी बोराखेडी पोस्टे.ला ९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,सहा जणांनी सोशल मिडीया इन्स्टाग्राम, पेâसबुक व व्हॉटसअ‍ॅपवर ९ ऑक्टोबर रोजी मोताळा येथे ईद-ए-मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे मोबाईलद्वारे काढलेल्या व्हीडीओमध्ये १० एप्रिल २०२२ रोजी रामनवमी निमित्त हिंदू धर्मियांनी काढलेल्या रामनवमीचा व्हीडीओ एकत्रीत करुन ‘इस्लाम जिंदाबाद, प्यारे बच्चो जो कुछ करना था, कर लो अब्बु आ रहे है’ असे सोशल मिडीया व्हॉटसअ‍ॅप, पेâसबुक व इंस्टाग्रामवर प्रसारीत करुन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपरोक्त फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.ला सहा  आरोंपीवर बोराखेडी पोस्टे.ला अप. क्र.०४३४/२२ नुसार भादंवीचे कलम २९५-ए, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.