महाराष्ट्रात शिवसेना या नावातच दरारा होता, शिवसेना म्हणजे वाघासारखा रुबाब, मस्ती आक्रमक आणि एकवेळ अशी होती की, हिंदु हृदसम्राट बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या आवाजाने धावती मुंबई थांबायची. शिवसेना आणि बाळासाहेब असे समीकरण होत. ज्या माणसाने आपल अख्ख आयुष्य शिवसेना उभी राहण्यासाठी खर्च केलं, ते तुम्ही स्वार्थापायी धुळीत मिळवलं!तुमच्या राजकारणाच्या लढाईत तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अंत केलायं, जनता तुम्हाला माफ करणार नाही.
40-50 वर्षाचा जुना राजकीय नोंदणीकृत, अधिकृत पक्ष व त्याचं चिन्ह असं एका झटक्यात गोठवलं नक्की कसं जातं ? वाईट आहे आजच सर्व राजकारण. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली होती, हे तुम्हाला माहिती आहेच. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. नंतर हिंदू हृदसम्राट बाळासाहेबांनी 1990 च्या दशकात हिंदुत्व वादाचा स्वीकार केला पण मराठीचा मुद्दा त्यांनी कधीच सोडला नाही. सन 92 च्या दंगलीत 2 दिवस झाल्यावर त्यांनी राधाबाईची चाळ घटनेनंतर त्यांनी सामना मध्ये लिहले, ‘हातात बांगड्या भरल्यात काय?’ त्यां नंतर दंगल आणखी धुमसलीआता जरी खूप लोकांना वाईट वाटत असेल तर तो 90 चा काळ होता. फ्री प्रेस जर्नल’मधून बाळासाहेब बाहेर पडले आणि .’मार्मिक’.साप्ताहिक काढली. वाचा आणि गप्प बसा असा लेख लिहून हे मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली.
बाळासाहेब नावच झंझावात असा कधीच पूर्ण महाराष्ट्राने कधी पहिला नव्हता. सन 1967 मध्ये दक्षिणी भारतीयांच्या मुद्यावरुन त्यांनी पूर्ण मुंबई मध्ये आक्रमक रूप घेतले होते.’उठाव लुंगी बाजाव पुंगी’ अस म्हणत मराठी माणसाला नोकरी डावलण्यात येणाऱ्या दक्षिणी भारतीय वर ठाकरे स्टाईलने हिसका दाखवला. बेळगाव महाराष्ट्र मध्ये यावे म्हणून त्यांनी 69 काळात झालेल्या आंदोलनात 52 लोक हुतात्मे झाले त्यात त्यानां पाहिल्यांदा अटक पण झाली.कृष्णा देसाईचा खून झाला न परळ झालेल्या निवडणुकीत सेनेचे पहिला आमदार वामनराव महाडिक विधानसभेत गेले. साम्यवाद्यांना आटोक्यात आणायला वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांनी छुपे सहकार्य केले. दादा कोंडके यांना मराठी चित्रपट साठी चित्रपटगृह त्यांनीच मिळवून दिले. बाळासाहेबांचं सर्वात मोठा खजिना होता त्यांचे कट्टर शिवसैनिक, त्यामुळेच आजही अजून शिवसेना टीकून आहे. बाळासाहेबांना भेटायला शिवसैनिकला कधी परवानगी लागली नाही
आता शिवसेना किती जागा लढवणार हे सहकारी पक्ष ठरवतात. त्यावेळी मात्र सहकारी पक्ष किती जागा लढवणार हे बाळसाहेब ठरवायचे..!!
बाळासाहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला खूप मोठ्या पदार्यंतचे नेते तयार केले जसे की, मनोहरराव जोशी, छगन भुजबळ, साबीर शेख, गणेश नाईक, नारायण राणे,उद्धव ठाकरे , राज ठाकरे, मधुकर सरपोतदार, धर्मवीर आनंद दिघे, सुधीर जोशी , एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, प्रतापराव जाधव, विजयराज शिंदे, स्व.राजेंद्र गोडे, गुलाबराव पाटील, राजन विचारे अशी मंडळी शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवली.
बाळासाहेबांनी एकदा तोंडातून काढले ते जरी चुकीचे असेल तर ते त्यांनी कधीच मागे घेतले नाही. पण सध्याचे नेते अजून शुद्ध खिशात राजीनामे घेऊन फ़िरत आहे. बाळासाहेब यांचे प्रत्येक भाषण म्हणजे पर्वणी असायची, जी शिवसेना संपवायची कोणाची लायकी नव्हती आज तुम्ही बाळासाहेब गेल्यानंतर महाराष्ट्राच्या एका जबरदस्त पक्षाला संपवलं, लक्षात ठेवा जनता तुम्हाला कदापीही माफ करणार नाही!
लेखक -शुभम घोंगटे, आव्हा ता.मोताळा मो. ८७८८००८०६१
(सदर विचार हे उपरोक्त लेखकाचे आहेत)