मेहकरमध्ये दुचाकी चोरट्यांचा हैदोस; 3 मोटार सायकली केल्या चोरट्यांनी लंपास!

145

मेहकर(BNUन्यूज)बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे यासह दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गोरगरीब जनता मोटार सायकल चोरीला गेली केली, पोलिस स्टेशनला जातात, त्या ठिकाणी तक्रार लिहून देतात. परंतु अनेकांच्या तक्रारीचा FIR नोंद केल्याच जात नाही. मग त्या मोटार सायकलीचा शोध कसा लागेल, हे एक अनाकलनीय कोडचं आहे. मेहकर पोलिस स्टेशनमध्ये 9 व 10 ऑक्टोबर रोजी 3 मोटार सायकल चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली असून याबाबत मेहकर पोस्टे.मध्ये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका वाहतूक पोलिसाची मोटार सायकल सुध्दा चोरट्याने चोरली आहे.

अशोक विष्णू करे यांनी 9 ऑक्टोबर रोजी मेहकर पोस्टे.ला फिर्याद दिली असून त्यांनी म्हटले आहे की, ते मेहकर पोस्टे.मध्ये पोकाँ.पदावर मागील 5 वर्षापासून वाहतूक शाखेत काम करतात, त्यांनी त्यांची बजाज कंपनीची दुचाकी पल्सर गाडी क्र.MH-28-BJ-0077 9 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद फिक्स पाईंट ड्युटी कामी इंद्रप्रस्थ चौक मेहकर येथे कर्तव्यावर असतांना रात्री 7 वाजेच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाल्याने जानेफळ चौक येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेले असता, करे यांनी मोटार सायकल लाहोटी हॉस्पीटल समोर उभी केली असता, 8 वाजता मोटार सायकल दिसून आली नाही. गाडीची अंदाजे किंमत 50हजार असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांच्या जर दुचाकी चोरीला जात असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. करे यांच्या फिर्यादीवरुन मेहकर पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत लाला दादाराव सोळंके रा.नांद्राधाड ता.मेहकर यांना त्यांचा भाऊ दत्ता सोळंके यांनी घेवून दिलेली HF DELUX क्र. MH-37-U-6729 अंदाजे किंमत 20 हजार 1 ऑक्टोबरला चोरी गेल्याची फिर्याद 10 ऑक्टोबर रोजी लाला सोळंके यांनी मेहकर पोस्टे.ला दिली. तर तिसऱ्या घटनेत दिनेश साहेबराव आसोले रा.नागझरी यांची शाईन कंपनीची दुचाकी क्र.MH -28-AY-4523 नांद्रा धांडे शिवारातून 1 ऑक्टोबर रोजी चोरीला गेली असून तीची किेमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपरोक्त फिर्यादीवरुन मेहकर पोलिसांनी भादंवीचे कलम 379 अन्वये अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मोटार सायकल चोरट्यांचे रॅकेट तर सक्रीय नाही ना?
जिल्ह्यात अनेक मोटार सायकली चोरी होत आहेत, परंतु त्या दुचाकी सापडत नसल्याने चोरटे त्या कुठे विकतात की त्यांचे पार्ट खुल्या बाजारात विकतात. सदर मोटार सायकली का सापडत नाही. बुलढाणा जिल्ह्यात दुसऱ्या राज्यातील मोटार सायकल चोरट्यांचे रॅकेट तर सक्रीय ना? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केल्या जात असल्यामुळे मोटार सायकल चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे..