टाटा इंडिगोने शेतकऱ्याच्या बैलगाडीला उडविले; नांदुरा तालुक्यातील महाळूंगी येथील घटना; 45 हजाराचे नुकसान!

228

नांदुरा (BNUन्यूज) नांदुरा तालुक्यातील महाळूंगी येथील शेतकरी बैलगाडी घेवून शेतात जात असतांना बुलढाण्याकडून येणाऱ्या टाटा इंडिगोने बैलगाडीला मागून धडक दिली. सुदैवाने जिवीतहानी टळली परंतु शेतकऱ्याच्या बैलजोडी मार मारला असून शेतकऱ्याचे जवळपास 45 हजाराचे नुकसान झाले आहे.

महाळूंगी येथील 62 वर्षीय शेतकरी अशोक पुंडलीक अवचार यांनी नांदूरा पोस्टे.ल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचाकडे 12 एकर शेती आहे. ते 26 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6.30 वाजेच्या दरम्यान शेतातून येत असतांना त्यांना महाळूंगी शेतशिवारात मधुकर तायडे यांच्या शेताजवळ बुलढाणाकडून येणाऱ्या टाटा इंडिगो कार क्र.एम.एच.01सीजे.0248 चे चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून अशोक अवचार यांच्या बैलगाडीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बैलाला मार लागला असून गाडीतील साडेतीन क्विंटल कापूस रस्त्यावर सांडून 25 हजार व बैलाचे 20 हजार असे एकूण 45 हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अश्या अशोक अवचार यांच्या फिर्यादीवरुन नांदुरा पोस्टे.ला कार चालकांविरुध्द भादंवीचे कलम 279, 427, 429 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो संग्रहीत घटनेशी संबंधीत नाही)