बुलढाणेकरांनो बाहेरगावी गेले तर सावधान.. कुळकर्णी व भुतडा यांचे घर फोडले; 63 हजाराचा मुद्देमाल लंपास!

263

बुलढाणा (BNUन्यूज) दिवाळी व भाऊबीज निमित्त बाहेरगावी गेलेल्या राहुल कुळकर्णी व सुभाष भुतडा यांच्या श्रीनिवास प्राईड रोहाऊस कॉलनी चिखली रोड, बुलढाणा येथे असलेल्या घराचे कुलूप तोडून घरामधील सोन्याच्या दागीन्यासह रोख रकमेवर डल्ला मारीत 63 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी घडल्याने बुलढाणेकरांनो बाहेर गावी चालले तर सावधान, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

राहुल कुळकर्णी यांनी बुलढाणा शहर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते भाऊबीजनिमित्त 26 ऑक्टोबर रोजी पत्नी व मुलासोबत बाळापूर येथे गेले होते. दरम्यान त्यांना घराशेजारी राहणारे आडवे यांनी फोन करुन घराचा दरवाजा लॉक केला नव्हतो का?, अशी विचारणा केली होती. फिर्यादी राहुल कुळकर्णी बाळापूर येथून बुलढाणा येथे आले असता त्यांना आलमारीमध्ये ठेवलेली सोन्याची 5 ग्रॅमची अंगठी 15 हजार रुपये, कानातील रिंग 5 ग्रॅम 15 हजार व 7020 रोख रक्कम चोरी गेल्याचे फिर्याद दिली. तसेच त्यांच्या वरच्या मजल्यावरील सुभाष भुतडा हे सुध्दा दिवाळीनिमित्त खामगावला गेले होते, त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन सोन्याची अंगठी वजन 5 ग्रॅम किंमत 20 हजार, चांदीच्या 3 वाट्या 9 तोळे किंमत 3 हजार, नगदी 3500 हजार रुपयांचा माल चोरट्याने चोरुन नेल्याच्या सुभाष भुतडा यांनी फिर्यादी दिली. कुळकर्णी व भुतडा यांच्या फिर्यादीवरुन बुलढाणा शहर पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुद भादंवीचे कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ.दत्तात्रय नागरे हे करीत आहे.