धरणात बुडून इसमाचा मृत्यू! मोताळा तालुक्यातील पिं.देवी येथील घटना

221

मोताळा(BNUन्यूज) सासरी आलेला जावाई खेकडे व मासे पकडण्यासाठी गोरणाला धरणावर गेला असता त्याचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज १९ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोताळा तालुक्यातील पिं. देवी शिवारात उघडकीस आली. मृतक हा भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील असून त्यांचे नामदेव सदाशीव जाधव असे आहे. ते पिं.देवी येथे सासरवाडीत पाहूणे म्हणून आल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार नामदेव जाधव (वय 40) हे धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या पिं.देवी येथे सासरवाडीत आले होते. 18 नोव्हेंबर रोजी ते सकाळी 9 वाजेच्या सुमारास पिंपळगाव देवी शिवारात असलेल्या गोरणाला धरणात ते मासे व खेकडे पकडण्यासाठी जातो,असे सांगून घरुन निघून गेले होते. परंतु सायंकाळी उशीरापर्यंत घरी न परत आल्याने त्यांचा शोधाशोध घेतला असता त्यांचा मृतदेह आज 19 नोव्हेंबर रोजी पाण्यावर तरंगतांना आढळून आला. घटनेची महिती मिळताच धा.बढे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. संतोष दांडगे यांच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला अप.क्र.40/2022 कलम 174 जाफौ.दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय.मधूकर महाजन हे करीत आहे.