आ. गायकवाड यांच्या पुढाकारातून बुलढाण्यात साकार होणार भव्य होमियोपॅथी भवन

847

गरीब रुग्णांवर उपचारासाठी 1 कोटीचा निधी केला मंजूर !

@buldananewsupdate.com
बुलढाणा(24Dec.2022)आ.संजय गायकवाड आमदार झाल्यापासून त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात बुलढाणा तसेच मोताळा तालुक्यात करोडो रुपयांचा निधी खेचून आणीत विविध विकास कामे मार्गी लावले आहेत. आता आ.गायकवाड यांच्या पुढाकारातून बुलढाणा शहरात लवकरच होमियोपॅथी भवन उभारले जाणार असून या भवनात गरीब रुग्णांवर मोफत उपचार केला जाणार आहे. या भवनासाठी त्यांनी भुखंडासह एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.

बुलढाणा शहरात जवळपास 70 पेक्षा अधिक होमिओपॅथी डॉक्टर आपली होमिओपॅथी आरोग्य सेवा देत असून त्या डॉक्टरांनी आपली सामाजिक बांधिलकी नेहमी जपली आहे. याच सामाजिक जाणिवेतून बुलडाणा तसेच आसपासच्या गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना मोफत होमिओपॅथी सेवा उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा मानस आहे. या बाबत संघटनेच्या वतीने आ. संजय गायकवाड यांची भेट घेवून भुखंड व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आश्वासन दिले की, या भवनाचा गरीब रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहेत.

होमियोपॅथी असोसिएशनकडून सत्कार
आ. संजय गायकवाड यांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्‌दल त्‍यांचा होमिओपॅथी असो.कडून सत्‍कार करण्यात आला. यावेळी, डॉ. होमियोपॅथी असोसिएशनचे डॉ.अविनाश महाजन, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ. निलीमा जाधव, डॉ. सागर जोशी, डॉ. गजानन सुरडकर, डॉ. तौसिका वानखेडे, डॉ. दिपाली बारोटे, डॉ. अरुणा बोरे, डॉ. अभिजित पाटील, डॉ. पवन बजाज, डॉ. उमेश जाधव, डॉ. दिनकर शिंदे, डा. शेख, डॉ. डांगे, डॉ. सरकटे, डॉ. देवकर, डॉ. वाघ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.