अजितदादा पवारांच्या ‘त्या’वक्तव्याचा बुलढाण्यात निषेध!

186

@buldananewsupdate.com
बुलढाणा(5 JANU.2022) छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (AJITDADA PAWAR)यांनी केले होते, त्या विक्तव्याचा आज 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष सौ.रंजनाताई बोरसे (RANJANATAI BORSE)यांच्या नेतृत्वात अजितदादा पवार यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करायचा की धर्मवीर यावरून राज्यात सध्या राजकीय वाद सुरू आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केल्याचे म्हटले असून ज्या राजांनी हिंदूधर्मासाठी प्राण दिला त्यांना धर्मवीर म्हणून ओळखले जाते ते धर्मवीर नव्हते असा दावा करून विनाकारण वातावरण गढूळ केले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना (SANBHAJI MAHARAJ)धर्मवीर म्हणू नये, असे विधानसभेत सांगितले याचा निषेध करण्यात आल्याचे सौ.रंजनाताई बोरसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सौ.रंजनाताई बोरसे, मंगला दिवनाले ,सपना भालेराव, संगीता येऊल, संगीता वरखडे, कमल राठोड , शारदा इंगोले, मंगला उबे, सविता वयतकार, अनिता कड, संध्या कवडकर ,कल्पना वयतकार, संगीता वैराळकर, एकनाथ काकड, शैलेश करगर, देविदास टिळे, गुलाबराव आचरण, अंबादास टिळे, प्रविण सुशीर, देविदास गोवेकर , कृष्णा कनकर, बाळू वाघमोडे सहभागी झाले होते.