मलकापूर- नांदुरा तालुक्यातील काटी येथे श्री सद्गुरु वियोगी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मागील 41 वर्षापासून हनुमान मंदिर येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शुक्रवार 2 जानेवारीपासून श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम संकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचन हभप.प्रमोद महाराज राहणे पळशी झाशी हे करणार आहेत. 9 जानेवारी रोजी काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून रात्री हभप.रंगनाथ महाराज संभाजीनगर यांच्या रंगतदार भारुडाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 7 ते 8 विष्णु सहस्त्रनाम, सकाळी 9 ते 12 व दुपारी 2 ते 5 भागवत वाचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ तर रात्री 8 ते 10 दरम्यान किर्तनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. विष्णु सहस्त्रनाम हभप.रामदास महाराज काटी, हभप.पुंडलीक महाराज मास्कर शेगाव, हभप.गजानन महाराज मारोडे व हभप. संदीप महाराज हिवाळे काटी हे करणार आहे. तर शुक्रवार 2 जानेवारी रोजी हभप.महादेव महाराज चिवरे कन्नळ, शनिवार 3 जानेवारी हभप.ऋषीकेश महाराज बोराळे आळंदी देवाची, रविवार 4 जानेवारी शुभम महाराज देशमुख जळका तेली, सोमवार 5 जानेवारी हभप.कु.प्रतिताई महाराज वळगाव तिघ्रा, मंगळवार 6 जानेवारी हभप.कैलास महाराज धर्माळी गुरुजी खामगाव, बुधवार 7 जानेवारी हभप.कृष्णा महाराज बेलोकार वाघुळ, गुरुवार 8 जानेवारी हभप.पुंडलीक महाराज मास्कर शेगाव यांचे संकिर्तन होणार आहेत. भागवत संकिर्तनाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक सांप्रदायिक भजनी मंडळ व काटी ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे.
काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता..
शुक्रवार 9 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 10 वेळेत भागवत ग्रंथाची सद्गुरुच्या फोटोसह गावातून दिंडी प्रदक्षिणा, 10 ते 12 हभप.प्रमोद महाराज राहणे पळशी झाशी यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. रात्री छत्रपती संभाजीनगर येथील हभप.रंगनाथ महाराज यांच्या बहारदार भारुडांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.



























