5335 रुपये आधारभूत दराने हरभरा नोंदणीस सुरुवात

232

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (28 FEB.2023) रब्बी हंगाम 2022-23 किमान आधारभूत दरानुसार हरभरा विक्रीकरीता शेतकरी बांधवांनी नाफेड व महाएफपीसी पुणे यांच्याकडून मान्यता प्राप्त नळगंगा ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड मोताळाच्या अंत्री येथील खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे.

नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा, पेरेपत्रक सहीत मुळप्रत (तलाठी सातबारा किंवा ऑनलाईन डिजीटल सातबारा) आधारकार्ड व बँक पासबूक झेरॉक्स(जनधन खाते देवू नये) तसेच सध्या चालू असलेला मोबाईल नंबर द्यावा. कंपनीचे मुख्य कार्यालय मलकापूर अर्बन समोर नांदुरा, रोड मोताळा येथे आहे. खरेदी व नाव नोंदणी केंद्र संत तुकाराम वेअर हाऊस अंत्री येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी संदर्भात अधिक माहितीसाठी प्रवीण दिनकर जवरे मो.9922765076, आशिष जवरे मो.9665628618, अनिल जवरे मो. 9673319822 संपर्क साधावा.