गरिबांना हक्काचे घरकुल देता कुणी घरकुल? पितापुत्राचे उपोषण तिसऱ्या दिवशीही बेदखल!

325

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (5 Mar.2023) भारतात लोकशाही असून काय’द्याचे’ राज्य असल्याने आजकाल प्रत्येक गोरगरीबांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी पायपीट करुन सुध्दा न्याय मिळत नाही. तर पैसे फेको तमाशा देखो, वाल्यांना क्षणात न्याय मिळते, कसले हे स्वातंत्र, असा प्रश्न अनेकवेळा उपस्थीत केल्या जात आहे. घरकुल यादीमध्ये गडबड घोटाळा करणाऱ्या ग्रामसेवक व त्यांना पाठीशी घालणाऱ्या शेगाव पं.स.गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शेगाव तालुक्यातील माटरगाव खु.येथील गोविंदा सुर्यभान वाघ व शिवशंकर गोविंदा वाघ या पित्रापुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असून त्याची जिल्हा प्रशासनाने दखल न घेतल्याने ते आज 5 मार्च रोजी सुध्दा सुरुच आहे.

उपोषण कर्त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल क्रमांक ऑनलाईन 7 वा नंबर असतांना ग्रामसेवक यांनी आर्थिक लोभाच्या आशेपोटी विनाकरण क्र.५९ वर टाकला आहे. ग्रामसेवकाला शेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी पाठबळ देत असल्याने वर्षाभरापासून पाठपुरावा करुन देखील कोणत्याच प्रकारची ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. उपोषणकर्ते गरीब असून त्यांच्याकडे शेती किंवा स्वत:चे घर अथवा प्लॉट नाही. गोविंदा सुर्यभान वाघ यांचे यावर्षीच्या घरकुलासंबंधी केलेल्या यादीमध्ये माटरगाव खु. गावातून ऑनलाईन यादीमध्ये 7 नंबरवर नाव दिसत होते, परंतु सरपंच, सचिव, शेगाव पं.स.गटविकास अधिकारी यांनी संगणमत करुन त्यांचे नाव सातव्या क्रमांकावरुन ५९व्या क्रमांकावर टाकले आहे. सदर ग्रामवसेवक व गटविकास अधिकारी यांनी ऑनलाईन यादीमध्ये केलेल्या गडबड घोटाळ्याची चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी गोविंदा वाघ व शिवशंकर वाघ यांनी ३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आमरण उपोषण सुरु केले आहे. मागणी मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडविणार नसल्याचे उपोषणकर्ते शिवशंकर वाघ यांनी ‘बुलढाणा न्यूज अपडेट’ शी बोलतांना सांगितले.