काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरेगट) व वचिंतची महायुती झाल्यास ? पुरस्कृत उमेदवार म्हणून जिल्ह्याचे पुढील खासदार रविकांत तुपकरचं ??

3923

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (4 MAR.2023) प्रेमात आणि युध्दात व राजकारणात सर्व काही क्षम्य असते, असे म्हटले जाते. परंतु राजकारणाला सहानुभूती, जात व धर्माची किनार असल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही. सध्या मराठी माणसाच्या मुद्यावर उध्दव ठाकरे शिवसेना गटाला मोठी सहानुभूती असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याच मराठी माणसाच्या मुद्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सरकार स्थापन केले होते. आता महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्यास बुलढाणा जिल्ह्याचे पुढील खासदार रविकांत तुपकरच असू शकतात, अश्या चर्चांना मोठा उत आलाय. परंतु त्याला मतदारांची पसंदी व संयोग जुळून येणेही आवश्यक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरेगट व वंचितची महायुती होईल काय? महायुती झाल्यास ते रविकांत तुपकर यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठींबा देतील काय, ते रविकांत तुपकर मान्य करतील काय? असे अनेक प्रश्न उपस्थीत होत आहे.

11 फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पोलिसांना चकमा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न व पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज तसेच वार्ताकंन करणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करीत त्यांचेशी केलेले असभ्य वर्तन व मारहाण यामुळे या प्रकरणाला वेगळेचे वळण मिळाले होते. रविंकांत तुपकर व कार्यकर्त्यांना बुलढाणा शहर पोलिसांनी केलेली अटक त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सदस्या अ‍ॅड.जयश्रीताई शेळके यांनी घटनास्थळी घेतलेली धाव तसेच राकाँचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, खा.सुप्रियाताई सुळे, अजितदादा पवार यांनी भ्रमणध्वनी वरुन रविकांत तुपकरांशी केलेल्या चर्चेमुळे एक राजकीय समिकरण जुळून आले. त्यात अजितदादा पवार व अंबादास दानवे यांनी बुलढाणा येथील शेतकऱ्यांवरील लाठीचार्जचा विधानसभेत मुद्दा उचललेला आहे. परंतु त्याला वंचितची साथ हवी असून महाविकास आघाडीमध्ये अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी समाविष्ट झाली तर राज्यातील भाजपा-शिवसेनेला रोखण्यासाठी पुरस्कृत उमेदवार म्हणून खासदारकीच्या निवडणूकीत रविकांत तुपकरांना पाठीबा दिल्यास भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी दस्तरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचार करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात आल्यास ते तुपकारांना खासदार होण्यापासून रोखू शकत नाही, असा दावा केला जात आहे.

सन 2019 लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना 5 लाख 21 हजार 978 मतदान मिळाल्याने ते विजयी झाले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांना द्वितीय स्थानी होते, त्यांना 3 लक्ष 88 हजार 690 मतदान मिळाले तर तृतीयस्थानी वंचित आघाडी बळीराम शिरस्कर 1 लक्ष 70 हजार 721 एवढे मतदान मिळाले होते. आता शिवसेना-भाजपा युतीमधील शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून त्यामध्ये उध्दव ठाकरे गटाचे सुध्दा मोठे मतदान वेगळे होणार असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची कार्यकर्ता फौज सुध्दा लक्षणीय असून त्यांचे सुध्दा मतदान आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे मतांची साथ मिळणार आहे. व वंचित महायुतीत सहभागी झाल्यास खा. प्रतापराव जाधव यांना 2024 च्या निवडणूकीत मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

वंचितची मनधरणी कोण करेल ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार व वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे फारसे पटत नाही. परंतु उध्दव ठाकरे यांनी वंचितचे ॲड. बाळासाहेबांची मनधरणी केल्यास शिवसेना (उध्दवगट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व वंचितची महायुती होवून ते भाजपा व शिवसेना (शिंदेगट) रोखण्यासाठी यशस्वी होवू शकतात. हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतानुसार राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहे.