चोरट्याने चक्क कव्हळा येथील पाणी पुरवठा योजनेचे 47 हजाराचे साहित्यच केले लंपास!

282

सरपंच व सचिवांनी दिली अमडापूर पोस्टे.ला तक्रार

BNU न्यूज नेटवर्क..
चिखली (31 Mar.2023) जिल्ह्यात खरंच चोरटे काय चोरतील याचा आपण विचारही करु शकत नाही. चोरट्याने चिखली तालुक्यातील कव्हळा येथील जुन्या पाणी पुरवठा योजनेचे 46 हजार 650 रुपयांच्या साहित्यवरच डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याबाबत कव्हळा ग्रा.पं.सरपंच व सचिवांनी 30 मार्च रोजी अमडापूर पोस्टे.ला.लिखीत तक्रार दिली आहे.

कव्हळा सरपंच रविंद्र डाळीमकर व सचिव यांनी अमडापूर पोस्टे.ला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, कव्हळा ग्रामपंचायतची जुन्या पाणी पुरवठा योजनेची एच.पी.अशोक कंपनीची मोटार 5.8 किंमत 30 हजार, लोखंडी वाल 2 नग 10 हजार, स्टार्टर 1 नग 1200 रुपये, कटआऊट 3 नग 450, लोखंडी जाळी यासह आदी साहीत्य 5 हजार रुपये असे एकूण 46 हजार 650 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे म्हटले असून, सदर घटना पाणी पुरवठा कर्मचारी दगडू पवार हे 28 मार्च रोजी जुन्या पाणी पुरवठा योजनेचे फोटो काढण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.