ठाकरे गटाने प्रतिसाद न दिल्यास कृउबा.समितीची निवडणूक स्वबळावर लढू-धैर्यवर्धन पुंडकर

282

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (29 Mar.2023) कृषी उत्पन्न बाजार समीती निवडणूकीत आपण ठाकरे गटासोबत युती करण्यास तयार आहे, परंतु प्रतिसाद न मिळाला तर स्वबळावर निवडणूक लढण्याचे आदेश देवून तालुकास्तरीय तत्काळ बैठक बोलवून आपली भुमीका जनतेपर्यंत पोहचविण्याचे आदेश वंचितचे जिल्हाप्रभारी राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी कार्यकर्ता बैठकीला संबोधीत करतांना केले.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात आज बुधवार 29 मार्च रोजी वंचितची महत्वपूर्ण बैठक विश्रामगृह बुलढाणा येथे जिल्हाप्रभारी राज्य उपाध्यक्ष तथा धैर्यवर्धन पुंडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना निलेश जाधव यांनी वंचित बहुजन आघाडी ही पक्षाचा आदेशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये प्रामणीकपणे कार्य करुन बहुजनांना या निवडणुकीमध्ये प्राधान्य देऊन निवडनुकीला सामोरे जावू, असे निलेश जाधव म्हणाले. यावेळी महासचिव प्रशांत वाघोदे, अशोकसिंग सुरळकर, अमर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीला विद्याधर गवई, शेषराव मोरे,विनायक मापारी,रमेश आंबेकर,आबाराव वाघ,संजय धुरंधर,बाळु भिसे समाधान डांगरे,विशाल गवई,पंडित मोरे,जितू निकाळजे,संजय खराटे, लुकमानशेख,बाळाभाऊ वानखेडे,सुनील आराख,कैलास म्हस्के,शेखवलील, मिलींद वानखेडे,असलमखान,दीपक आंभोरे, प्रशिस इंगळे, प्रदीप वाकोडे, भास्कर नरवाडे, नामदेव धंदर यांच्यासह असंख्य कार्यकर्ता व नेते मोठ्या संख्येने हजर होते.