BNU न्यूज नेटवर्क..
नांदुरा (2 Apr.2023) औरंगजेबाचा पुळका असणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत:च्या बापाचे नाव बदलून तेथे औरंगजेब लिहावे, असा उपहासात्मक सल्ला शिवव्याख्याते खंडूजी डोईफोडे यांनी देत स्वयं केंद्रित स्वार्थासाठी बापाची आणि भावाची हत्या करणाऱ्यांचा आदर्श महाराष्ट्र ,देश कसा ठेवेल, असा प्रश्न उपस्थित करीत रयतेच्या स्वराज्यासाठी त्याग आणि बलिदान करीत सर्वस्व समर्पित करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यातील प्रत्येकजन आदर्श मानतो. त्यामुळे यापुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या स्वराज्यद्रोही औरंगजेबाच्या अवलादींना शिवरायांचे मावळे धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही., असा इशारा शिवव्याख्याते खंडूजी डोईफोडे यांनी दिला आहे.
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे 30 मार्चला सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवराय आणि श्रीराम जयंती निमित्त शिवव्याख्याते खंडोजी डोईफोडे सोलापूरकर व प्रबोधनकार अँड सतीषचंद्र रोठे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज व श्रीराम सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि वडनेर भोलजी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ लॉन वडनेर भोलजी येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शिवव्याख्याते खंडूजी डोईफोडे बोलत होते. या जाहीर व्याख्यानाला जिल्ह्यातील भारतीय सिमेवरील जवान, सामाजिक, राजकीय तथा क्रीडा क्षेत्रातील बहुसंख्य शिवप्रेमी, जिजाऊ लेकींची उपस्थिती होती.जय श्रीरामच्या घोषणा व गगनभेदी शंखनाद विषेश आकर्षण ठरले. सर्वप्रथम विधिवत श्रीरामांची महाआरती, वडनेर भोलजी येथील भारतीय सिमेवरील जवानांचा व उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करीत जाहीर व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
शिवरायांच्या मावळ्यांनी एकसंघ व्हावे-अॅड.सतिषचंद्र रोठे
छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांनी एकसंघ होऊन महापुरुषांच्या धर्म संस्कार आणि संस्कृतीचे संरक्षण केले पाहिजे. तरच येणाऱ्या काळात छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अबाधित राहील. अन्यथा विखुरलेल्या स्वराज्याला धूळीस मिळायला वेळ लागणार नाही, असा इशारा प्रबोधनकार अॅड.सतीशचंद्र रोठे यांनी मनोगत व्यक्त करतांना प्रथम सत्रात दिला.