तर समोर येईल, बेपत्ता झालेल्या महिला व मुलींची अचूक माहिती !

405

शोधासाठी डेटाबेस सॉफ्टवेअर व अ‍ॅपची आवश्यकता

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (4 Apr.2023) महाराष्ट्रात महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला व मुली बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे पुढे काय होते, याची कोणत्याही प्रकारची माहिती पोलिस प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत नाही. यासाठी राज्याच्या गृह विभागाने बेपत्ता महिला व मुलींच्या शोधासाठी शासनस्तरावर सॉफ्टवेअर व अ‍ॅप विकसीत केले तर खरी माहिती समोर येवून किती महिला व मुली बेपत्ता झाल्या, त्या कुठे आहेत, त्यापैकी किती लव्ह जिहादला बळी पडल्या याची अचूक माहिती समोर येईल.

राज्यामध्ये सध्या महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातील अनेकजण इज्जतीचे लख्तरे वेशीवर टांगले जातील यामुळे, पोलिस स्टेशनला याबाबत फिर्याद देत नाही. तर अनेक मुली लग्न करुन परत येतात, याबाबत सदर माहिती आई-वडिल पोलिसांना कळवित नाहीत. तर अनेक मुली पळून जावून लग्न करतात, त्या मुलींना त्यांच्या प्रियकाराने सोडल्यास पुढे त्यांचा आई-वडिल त्यांचा स्वीकार करीत नसल्यामुळे त्या मुली वेश्या व्यवसायाकडे वळतात, त्यांचे पुढे काय होते याची माहिती मात्र पोलिस विभागाकडे उपलब्ध नसल्याचे भयावह वास्तव आहे. तर अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडून त्यांचे आर्थिक, मानसीक शोषण होवून त्यांच्यावर असाह्य अत्याचार होवून त्यांचा मुले पैदा करण्याची फॅक्टरी म्हणून उपयोग केल्या जातो का? बेपत्ता झालेल्या किती महिला व मुली लव्ह जिहादला बळी, पडल्या याची आकडेवार सुध्दा समोर आलेली नाही.

सध्या फाईव्हजीच्या युगात विज्ञानाने मोठी मजल मारल्याने काही सेकंदात देश-विदेशात फोन व व्हीडीओ कॉलींगच्या माध्यमातून संपर्क साधता येतो. व्हीडीओ कॉलसाठी विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. आता प्रत्येकांची आधार व पॅनकार्डमुळे ओळख निर्माण झाली असून त्याला बँकेचे खाते लिंक करण्यात आलेले आहे. बँकेचे अकाऊंट काढण्यासाठी पॅन कार्ड व आधारकार्ड सक्तीचे आहे, असे असतांना सुध्दा अनेक बेपत्ता झालेल्या महिला व मुली कुठे आहेत, त्यापैकी किती लव्ह जिहादला बळी पडत आहे. पुढे त्या महिलांचे काय झाले, त्या जिवंत आहेत की मृत्यू पावल्या याची माहिती समोर येणे गरजेचे आहे. आधार खाते बँकेशी जोडलेले असल्यामुळे नागरिकांना थंब देवून पैसे काढता येतात, असे असतांना बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचा शोध का लागत नाही, हे मात्र दुदैवच म्हणावे लागेल.

सॉफ्टवेअर व अ‍ॅपची आवश्यकता

प्रत्येकाची ओळख म्हणून आधार कार्ड व पॅन कार्ड ग्राह्य धरल्या जाते. आधार व पॅन कार्डची सर्वीकडे आवश्यकता भासते, बँक खाते यासह आदी शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारकार्ड व पॅन नंबरची आवश्यकता आहे. म्हणजे नागरिकांची संपूर्ण माहिती आधारकार्ड व पॅनकार्डमध्ये दडलेली असतांना सुध्दा महिला व मुली बेपत्ता होतात, याची संपूर्ण माहिती कळण्यासाठी शासनाने आधार व पॅनकार्ड बेसड डाटाबेस सॉफ्टवेअर व अ‍ॅप. विकसीत केल्यास पळून गेलेल्या महिलांचे थंब किंवा आधार नंबरच्या आधारे त्यांनी कोणाशी लग्न केले याची ओळख पटविण्यास मदत होईल, एवढे मात्र निश्चीत!

अमरावती विभागात 35 दिवसात झाल्या 379 मुली व महिला बेपत्ता !

महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण राज्यामध्ये झपाट्याने वाढत आहे. अमरावती विभागामध्ये 1 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जवळपास 379 महिला व मुली बेपत्ता झाल्या असून त्याचे एका दिवसाचे प्रमाण 11 आहेत. यामध्ये सर्वाधीक अमरावती जिल्ह्यात (अमरावती ग्रामीण व शहर) भागातील एकूण 122 तर त्या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातील 106, अकोला जिल्ह्यातील 57, बुलढाणा जिल्ह्यातील 54 तर वाशिम जिल्ह्यातील 40 अश्या एकूण 379 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत.