Saturday, April 18, 2026
Home Breaking News बुलढाणा रोडवर विपरीत घडलं; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; 2 जखमी

बुलढाणा रोडवर विपरीत घडलं; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; 2 जखमी

9

मोताळा -वाहने वाढल्याने अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ट्रकच्या धडकेत राजुर येथील 1 जण ठार तर दोनजण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार 10 एप्रिल रोजी सायंकाळी सातेसात वाजेच्या सुमारास बुलढाणा-मलकापूर रोडवरील त्रिमुर्ती पेट्रोलपंपाच्या काही अंतरावर घडली. मृतकाचे नाव सचिन हनुमान तिवारी असे आहे. तर पांडुरंग दोडे व मंगेश पाटील जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवार 10 एप्रिल रोजी राजुर येथील एम.एच.28 बी.एम.7193 दुचाकीने सचिन तिवारी, पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे राजुर येथून मोताळा येथे दवाखान्याच्या कामासाठी जात होते, दरम्यान त्यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्रिमुर्ती पेट्रोलपंपावर थांबले व पेट्र्रोल भरले. ते पुढे मोताळाकडे जात असतांना थोड्याच अंतरावर त्यांना भरधाव ट्रकने कट मारला. यामध्ये दुचाकीस्वार सचिन तिवारी हा गंभीर जखमी झाल्योन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदेवी घटना घडली. तर पांडुरंग दोडे व मंगेश पाटील हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी ठाणेदार सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय.राजेंद्र कपले, हेकाँ. प्रवीण पडोळ, हेकाँ.बळीराम खंडागळे, रमेश नरोटे, श्रीकांत चिंचोले, रविंद्र नरोटे, प्रमोद साळोक, मनोहर पंडीत यांनी घटनास्थळी धाव घेत Ambulanace 108 ला पाचारण करुन जखमींना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

 

 

Don`t copy text!