पोलिस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

243

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (1.May.2023) महाराष्ट्र दिनाचा ६३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे आज सोमवार 1 मे रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, प्रभारी जिल्हा पोलिस अधिक्षक थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आदी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी पोलिस दलातर्फे मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य शासनातर्फे विविध विभागात नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच जिल्हा युवा पुरस्कार आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थाचा गौरव करण्यात आला. यावेळी परिवहन महामंडळात नियुक्त करण्यात आलेल्या मंगेश पाखरे, सतीश वानखेडे, सुधीर वरगट, गजानन मुंडे, किरण पाटील, प्रशांत नवले, सूर्यदर्शन जायभाये, दिवाकर वडगावकर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक कल्याणी सुरतकर, राज्य उत्पादन शुल्क विभागात नियुक्त निकिता खापके, गोपाल मोरे, वस्तू व सेवा कर विभागात राज्य कर निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आलेल्या सरला शिंगणे, दिनेश चौथमोल, मंगेश खरात, भूमी अभिलेख कार्यालयात नियुक्त गोविंद फेरन, प्रतीक झोल्टे, अंकित मोदे, अश्विनी चाळगे, जयदीप ताठे यांना नियुक्ती प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यांचा करण्यात आला सत्कार

पोलिस दलात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिदमवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन करुटले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू मुंडे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी अरबट, आदर्श तलाठी अनिल जाधव, जिल्हा युवा पुरस्कार विष्णू आव्हाळे, संस्थामधून नांद्रा कोळी येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज संस्थेस गौरवण्यात आले.