आझाद हिंदचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3.May.2023) बुलढाणा जिल्ह्याला मातृतिर्थ जिल्हा म्हणून ओळख आहे. परंतु जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधधंदे व चोरींचे प्रमाण वाढले असून निर्दोष शेतकऱ्यावरील व आझाद हिंदच्या कार्यकर्त्यावरील बनावट गुन्हे मागे घेण्यात यावे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाची संयुक्तरित्या बैठक बोलविण्याची मागणी आझाद हिंद संघटनेच्यावतीने आज 3 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले.
आझाद हिंद संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अवैद्य धंदे तसेच अनधिकृत कॅफे बंद करावे, महिलांचे दागिने लुटमार प्रकरण,चोरी,दरोडा, मिरवणूकीत होणारे हल्ले, निर्दोष शेतकऱ्यावरील व आझाद हिंद च्या कार्यकर्त्यावरील बनावट गुन्हे मागे घ्यावे. दहशतमुक्त शहरासह, जिल्ह्यासाठी, ज्वलंत समस्या व तक्रारी सोडविण्यासाठी, जिल्हात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्तरीत्या बैठक बोलविण्यात यावी. यासाठी आज 3 मे रोजी आझाद हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. एच.पी.तूमोड यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दाहकता, मागण्यांची वास्तविकता तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन निेवेदन देण्यात आले. लवकरच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अँड.सतीशचंद्र रोठे, असलम शाह, अकिल शाह, मोहम्मद सोफियान,सुरेखाताई निकाळजे, सुमनताई राजपूत, ज्योत्स्ना नागरे, पंचफुलाताई गवई, योगेश कोकाटे यांच्यासह आझाद हिंदचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.