पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्या नांदुऱ्याच्या पोउनी.स्वप्नील रणखांबला निलंबीत करा !

452

मलकापूरातील पत्रकार एकवटले; तहसिलदारांना दिले निवेदन

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (4.May.2023) पोलिसांनी आपल्या वर्दीची ज्या ठिकाणी छाप सोडायला पाहिजे त्या ठिकाणी सोडत नाही, उलट लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांशी असभ्य वर्तन करुन त्यांना अपमानीत करण्याचे काम करीत आहे, असाच प्रकार नांदुरा येथे घडला आहे. तेथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या एका वृत्तपत्राचे पत्रकार अमर पाटील यांना लोटपाट करुन असभ्य वर्तणूक देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर स्वप्नील खणखांब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या नेतृत्वात मलकापूर तहसीलदारांना देण्यात आले.

नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी पार पडली. यावेळी बाजार समिती निवडणुकीचे वृत्त संकलन करण्यासाठी नांदुरा येथील एका वृत्तपत्राचे पत्रकार अमर पाटील व इतर पत्रकार तेथे गेले असता पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांनी अरेरावीची भाषा वापरून, हातातील दांड्याचा धाक दाखवत आपल्या पदाचा गैरवापर करत पत्रकारांना वृत्त संकलन करण्यास मज्जाव केला. तसेच इतर पत्रकार विनोद गावंडे, शुभम ढवळे यांना सुध्दा अनेक प्रतिष्ठीत नागरिकासमोर लोटपाट करुन अपमानीत केले आहे. पत्रकारांना हुकुमशाहीप्रमाणे वागणूक देण्याचा आरोप पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन त्याला निलंबीत करण्याची मागणी निवेदनात करण्या आली. निवेदन देतांना हिंदी मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील , विदर्भ समन्वयक श्रीकृष्ण तायडे, विदर्भ सचिव सतीश दांडगे, जिल्हाध्यक्ष गौरव खरे , जिल्हा प्रवक्ता श्रीकृष्ण मेहेसरे, तालुका अध्यक्ष उल्हास भाई शेगोकार, अध्यक्ष जमील पत्रकार, विनायक तळेकर, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, नथुजी हिवराळे जिल्हा सहसचिव, धर्मेंद्र राजपूत,प्रदीप इंगळे, अनिल झनके, संजय वानखेडे, मयूर लड्डा, निलेश चोपडे,प्रमोद हिवराळे, प्रकाश थाटे, सय्यद ताहेर, पंकज मोरे,प्रभाकर मोरे आदींची उपस्थिती होती.