बुलढाणा न्यूज अपडेटचे भाकीत ठरले खरे.. बाजार समितीच्या सभापतीपदी जालिंधर बुधवत!

401

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (16.May.2023)जिल्हा मुख्यालयी असलेल्या बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये आज मंगळवार 16 मे रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांची वर्णी लागणार असल्याची बातमी बुलढाणा न्यूज अपडेटने 16 मे रात्री 1 वाजता प्रकाशीत केली होती, ते भाकीत अखेर खरे ठरुन जालिंधर बुधवत यांची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड होवून अखेर गुलाल महाविकास आघाडीनेच उधळला आहे.

मागील महिल्यात 28 एप्रिल रोजी बुलढाणा बाजार समितीची निवडणूक पार पडली होती, त्याच दिवशी मध्यरात्री उशीरा लागलेल्या निकालात 18 पैकी 12 जागा महाविकास आघाडीने तर 6 जागा भाजपाला मिळाल्या होत्या. मंगळवार 16 मे रोजी सभापतीची निवड होणार असून यामध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ असल्याने एकही उमेदवार फुटणार नसल्याने जालींधर बुधवत यांची बाजार समितीच्या सभापतीपदी वर्णी लागणार असल्याची बातमी ‘बुलडाणा न्यूज अपडेटला’ विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती, याबाबत बुलडाणा न्यूज अपडेटने बातमी 16 मे मध्यरात्री 1 वाजता प्रकाशीत केली होती. ती तंतोतत खरी ठरली असून मतदारांनी सभापतीपदाच्या मतदानासाठी थेट हजर राहून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची सभापतीपदी निवड केली आहे. महाविकास आघाडीने बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर गुलाब उधळून आनंदोत्सव साजरा केला.

आ.डॉ.शिंगणे, बोंद्रे व सपकाळाची चाणक्यनिती यशस्वी

महाविकास आघाडीचे १२ उमेदवार मंगळवार 16 मे रोजी थेट बाजार समितीच्या मतदान केंद्रात दाखल झाले . त्यांच्यावर माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे व माजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांची नजर होती. त्यामुळे कोणीही कोणत्याही अमिषाला बळी पडले नसून महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ कायम ठेवीत सभापतीपदाची माळ जालिंधर बुधवत तर उपाध्यक्षपदाची माळ सौ.आशाताई नंदकिशोर शिंदे यांच्या गळ्यात पडली, हे विशेष !