युवतीचे फोटो व्हायरल प्रकरणी; सायबर पोलिसांनी तिघांना पकडले !

457

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (17.May.2023) सोशल मिडीयामुळे जग खूप जवळ आले आहे. कोणत्याही घटनेची माहिती क्षणार्धात मिळते. एकंदरीत सोशल मिडीयाचा चांगला वापर केला तर चांगला, तीचा वाईट वापर केला की, जेलची हवा सुध्दा खावी लागते. मुलीचे फोटो व्हायरल करणाऱ्या तिघांवर बुलढाणा सायबर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करुन तीन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.

किन्होळा येथील एका तक्रारदाराने 15 मे रोजी सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे फिर्याद दिली की, त्यांची मुलगी निवासी शाळेत शिक्षण घेत असतांना वळती येथील सागर हरिसिंग शिंगणे या युवकासोबत काढलेले त्यांचे फोटो तिचा माळवंडी येथील नातेवाईक संतोष हिरालाल माळी याने त्याचा माळवंडी येथील वर्गमित्र शाहरुखशहा गुलजारशहा याचे नावावर असलेले सिमकार्ड घेवून फोटो व्हॉटसअ‍ॅपर पिडीतेच्या नातेवाईकांच्या व्हॉटसअ‍ॅपर नंबरवर टाकून व्हायरल केले होते, याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी अप.क्र.25/2023 कलम 500 भा.दं.वि.सहकलम 66 (क) IT Act अंतर्गत दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी गुन्हयाचे तपासात ज्या मोबाईल क्रमांकावरुन पिडीतेचे फोटो व्हायरल केले त्याचा शोध घेवून आरोपी सागर शिंगणे, संतोष माळी व शाहरुखशहा गुलजारशहा यांना पकडून त्यांच्याकडून गुन्हा कामात वापरलेला मोबाईल हॅडसेट सायबर पोलिसांनी जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे, अपर पोलिस अधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे.निरीक्षक सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात सुनिल सोळुंके, सहा.पोलीस निरीक्षक, ज्ञानेश नागरे, पवन मखमले, विकी खरात, पंढरी सातपुते, दिपक जाधव, आनंद हिवाळे, सोएब अहमद यांनी केली.