स्थागुशाची नांदुऱ्यात धडक कारवाई; 3.22 लक्ष रु.ची देशी दारु व गुटखा पकडला!

428

BNU न्यूज नेटवर्क..
नांदुरा (18.May.2023) स्थानिक गुन्हा शाखेने नांदुरा येथे धडक कारवाई करीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा तसेच सुगंधीत पान मसाला 66880 रुपये तसेच देशी दारुचे बॉक्स 56 हजार व वाहतूक करणारी वॅगन कार असा एकूण 3 लक्ष 22 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. सदर कारवाई आज 18 मे रोजी दुपारी नांदुरा हद्दीतील पतोंडा नवीन गावठाण ता. नांदुरा येथे करण्यात आली.

स्थागुशाला देशी दारु व शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखा पथकाने आज गुरुवार 18 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान नांदुरा हद्दीतील आरोपी सुनिल बळीराम नेमाडे (वय 33) रा.पातोंडा नविन गावठाण ता. नांदुरा यांच्या येथे छापा टाकून 16 देशी दारू बॉक्स 90 एम एल चे किंम 56 हजार तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधित, तंबाखू विमल पान मसाला एकूण 608 गुटखाचे पाकिटे 66 हजार 880 व 2 लक्ष रुपयाची वॅगन कार असा एकूण 3 लक्ष 22 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थागुशाचे पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक सुनिल कडासणे व अप्पर पोलिस अधिक्षक खामगाव, बुलढाणा व स्थागुशा प्रमुख लांडे यांच्या मार्गादर्शनाखाली स्थागुशाचे पथकातील NPC राजू टेकाळे, NPC. गणेश पाटिल NPC अनंत फरतळे, PC गणेश शेळके, ड्रायव्हर पोलिस नाईक राहुल बोंर्डे व ड्रायव्हर PN राहुल बोर्डे यांनी केली. आरोपीवर नांदुरा पोस्टे.ला भादंवीचे कलम 328,188,273 सह कलम अन्नसुरक्षा मानके कायदा कलम २००६ चे कलम 26 (2)(IV) शिक्षा पात्र कलम 59 (1) अन्वये सहकलम 65(ई) मदाका. नुसार कारवाई करण्यात आली.