कोथळीत मैत्रीचा गोतावळा 25 वर्षानंतर एकत्र आला; जुन्या मित्रांनी दिला आठवणींना उजाळा !

1097

निमित्त होते ‘गेट टू गेदर’ कार्यक्रमाचे

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(18.May.2023) दहावीनंतर मुला-मुलींचे रस्ते वेगळे होतात खरे, त्यातील कित्येकवर्ष दहावीपर्यंत सारखी शिकलेली जिवाभावाचे मित्र परत जीवनाच्या वाटेवर परत केंव्हा भेटतील, हे सांगणे मात्र कठीण आहे. मोताळा तालुक्यातील कोथळी येथील जनता हायस्कूल मध्ये दहावीच्या सन 1997-98 च्या बॅचमध्ये शिकलेले विद्यार्थी तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आले, ते ‘गेट टू गेदर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून.. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील गोड-कडू आठवणींना उजाळा दिला.

सेामवार 15 मे रोजी शालेय अध्यापन घेतांना आलेले अनुभव, ऋणानुबंध वृध्दीगत करणे, शाळेविषयी असणारी आपुलकी, आत्मीयता जपावी यासाठी ‘गेट टू गेदर’ कार्यक्रमाचे कोथळी येथे आयोजन करण्यात आले होते. सन १९९7-98 या शैक्षणीक सत्रातील इयत्ता दहावीचा निकाल आतापर्यतचा उच्चांक केवळ ९३ टक्के लागला होता. अयशस्वी झाल्यानंतर परत प्रयत्न करुन यशस्वी कसे होता आले, शालेय अध्यापन घेतांना येणारे अनुभव अपु-या बसफे -या, सायकलीने डबलसीट तर काहीवेळा पायी आपले अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक शिवशंकर सुरळकर, सेवानिवृत्त शिक्षक का.आ.सनंसे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.एच.गवई, एस.बी.नाईक, एस.टी.सोनुने, सेनानिवृत्त शिक्षक अ.त्र्यं.घडेकर यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मनोजरंजन कथन करीत आलेले अनुभव कथन केले. यावेळी तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी प्रा.विजयसिंग भाबरदोडे, तुकाराम चव्हाण, लालचंद रबडे, गिरीश गांधी, जितेद्र चांडक, सोपान सावळे, सुभाष धिरबस्सी,जमीलखान, संजय गायकवाड, गिरधर मंझा, कैलास सनंसे, अ‍ॅड.सदानंद भुजबळ, अहीरे, सुर्यवंशी, रविंद्र गवळी यांनी शालेय जीवना येणारा संघर्ष व पुढील वाटचाल यावर आपले मनोगत व्यक्त करुन गोड-कडू आठवणींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन देविदास भारसाखळे, निवृत्ती राजगुरे यांनी करुन ते यश्यास्वी सुध्दा केले. यावेळी जमलेल्या मित्रांनी शाळेसाठी सदैव तत्पर राहू, अशी सर्वांनी शपथ घेतली. संचालन बसंदास नोळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.भाबरदोडे यांनी केले.