अमरावती विभागात यावर्षीही मुलीच मारतील बाजी; बुलढाणा जिल्ह्याचा 97 टक्के निकाल लागण्याची शक्यता?

430

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25.May.2023) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज गुरुवार 25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षीही अमरावती विभागामध्ये मुलीच बाजी मारतील ? जिल्ह्याचा मागीलवर्षी 96.36 टक्के निकाल लागला होता तो यावर्षी 97 टक्के लागणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र दुपारी 2 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतरच खरी आकडेवारी समोर येणार आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील 29 हजार 674 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, त्यापैकी प्रत्यक्षात 29 हजार 234 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. बारावीची परिक्षा 16 परिक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. यामध्ये बुलढाणा अंतर्गत असलेल्या परिक्षा केंद्रावर 2028, चिखली 3161, अमडापूर 1145, देऊळगाव राजा 3100, साखरखेर्डा 1892, मेहकर 2091, लोणार 2139, खामगाव-1 1602, खामगाव- दोन 1109, नांदुरा 1772, मोताळा 1844, मलकापूर 1809, जळगाव जामोद 1405, शेगाव 1601, संग्रामपूर 1120, धाड 1406 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर 440 विद्यार्थी गैरजहर होते.

अशी होती मागीलवर्षीची तालुकानिहाय टक्केवारी

सन 2022 मध्ये बुलडाणा तालुक्याचा निकाल ९६.८५ टक्के, मोताळा तालुका ९७.३३, चिखली तालुका ९७.७२ , दे.राजा ९७.३४, सिं.राजा ९७.७१, लोणार ९७.६८, मेहकर ९७.६८, खामगाव ९७.४८, शेगाव ९६.९६, नांदूरा ९६.५३, मलकापूर ९८.०५, जळगाव जामोद ९४.८७, संग्रामपूर तालुक्याचा ९८.२३ टक्के निकाल लागला आहे, त्याची टक्केवारी ९७.३१ टक्के एवढी होती. यावर्षी सदर टक्केवारी वाढते की घटते, हे मात्र आज गुरुवार 25 मे रोजी दुपारी 2 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतरच कळेल, एवढे मात्र निश्चीत!