बारावीचा निकाल जाहीर; अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा द्वितीयस्थानी; जिल्ह्याचा निकाल 93.69 टक्के !

238

जिल्ह्यात मुलीचं हुश्शार ; 95.17 टक्के निकाल

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (25.May.2023) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज गुरुवार २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्के लागला असून अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्ह्याचा निकाल 95.45 टक्के लागला असून प्रथमस्थानी आहे. तर तर बुलढाणा जिल्हा द्वितीयस्थानी असून जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के एवढा लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातील ६७ विद्यालयांनी शंभरी गाठली आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होताच विद्याथ्र्यांनी एकच जल्लोष केला.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत बुलडाणा जिल्हा अमरावती विभागात द्वितीयस्थानी असून जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के लागला आहे. बारावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 31 हजार 788 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज भरले होते, त्यातील 31 हजार 606 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परिक्षा दिली त्यापैकी 29 हजार 613 विद्यार्थी पास झाले आहे. त्याची टक्केवारी 93.69 टक्के एवढी आहे. त्यातील 3874 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीमध्ये पास झाले तर प्रथम श्रेणीमध्ये 11हजार 822 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 11 हजार 171 पास झाले आहे. तर 2 हजार 746 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के

आज 25 मे रोजी अमरावती विभागाचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला असून विभागाचा निकाल 92.75 टक्के एवढा लागला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्याचा निकाल 95.45 एवढा लागला असून प्रथमस्थानी असून त्यापाठोपाठ बुलढाणा जिल्ह्याचा निकाल 93.69 टक्के लागला आहे. अमरावती जिल्ह्याचा निकाल 90.78 टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल 93.11 टक्के, यवतमाळ जिल्ह्याचा 91.98 टक्के लागला आहे.

67 विद्यालयांनी गाठली शंभरी..

बारावीच्या निकालामध्ये यावर्षी जिल्ह्यातील 67 विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला असून, त्यामध्ये बुलढाणा तालुक्यातील 12 विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मोताळा तालुक्यात 1 विद्यालय, चिखली तालुक्यातील 15 विद्यालय, देऊळगाव राजा 6 , सिंदखेड राजा 6, लोणार तालुक्यात 5, मेहकर तालुक्यात 8, खामगाव तालुक्यात 4, शेगाव तालुका 5, नांदुरा तालुक्यात 1, मलकापूर तालुक्यात 1, जळगाव जामोद तालुक्यात 2 तर संग्रामपूर तालुक्यात 1 विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

असा आहे तालुकानिहाय निकाल

बुलढाणा जिल्ह्याचा निकाल 93.69 टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये बुलढाणा तालुक्याचा निकाल 95.25 टक्के, मोताळा तालुका 93.57 टक्के, चिखली तालुका 96.24 टक्के, देऊळगाव राजा तालुका 96.83 टक्के, सिंदखेड राजा 95.07 टक्के, लोणार तालुका 94 टक्के, मेहकर तालुका 94.79 टक्के, खामगाव तालुका 93.33 टक्के, शेगाव तालुका 89.02 टक्के, नांदुरा तालुका 86.98 टक्के, मलकापूर तालुका 91.22 टक्के, जळगाव जामोद तालुका 79.78 टक्के, संग्रामपूर तालुका 92.21 टक्के असा निकाल लागला आहे.