रिधोरा शिवारात विद्युत वितरण कंपनीची 27 हजाराची तार चोरट्याने केली लंपास !

333

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (10.JUNE.2023) चोर कशाप्रकारे आणि कुठे चोरी करेल हे सांगता येत नाही. फक्त त्याला पाहिजे पैसा, अशीच एक घटना धा.बढे पोस्टे अंतर्गत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या रिधोरा शिवारात घडली. चोरट्याने 27 हजार किमतीच्या अ‍ॅल्युमिनीअम तारच चोरुन नेली आहे. याबाबत धा.बढे पोस्टे.अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा तालुक्यातील धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या रिधोरा शिवारामध्ये गट नं.97 व 102 मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे मालकीचे 10 सिमेंट पोलवरील 2 हजार मिटर अ‍ॅल्युमिनीयम 27 हजाराची वीज वाहक तार चोरुन नेली आहे. सदर घटना 8 ते 9 जून च्या दरम्यान घडली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे धा.बढे कनिष्ठ अभियंता निलेश डहाके यांच्या फिर्यादीवरुन 9 जून रोजी धा.बढे पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटेनचा पुढील तपास पोहेकाँ.सुरेश सोनावणे हे करीत आहे.