रायपूर येथील सिरसाट दाम्पत्यांनी देहदानाचा संकल्प करुन साजरा केला लग्नाचा वाढदिवस

775

सोशल मिडीयावर वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांना दिली चपारक !!

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (14.JUNE.2023) सोशल मिडीयावर आजकाल शेकडो हजारो व्हॉटसॲप ग्रुप आहेत. या ग्रुपवर विचारांची देवाण तसेच वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून साजरा केल्या जातो. रात्री ग्रुपमधील नागरिक, मुले, महिला आपल्या वाढदिवसाचा केक तसेच लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापून त्याचे फोटो ग्रुपवर टाकायला विसरत नाही. परंतु बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील सिरसाट दाम्पत्यांनी देहदानाचा संकल्प करुन तसा अर्ज देखील आरोग्य सेवा जिल्हा शल्य चिकीत्सक अकोला यांच्याकडे सुपूर्द करुन लग्नाचा वाढदिवस साजरा करीत सोशल मिडीयावर आव आणणाऱ्यांना एक चपारक दिली आहे.

देहदान सर्वश्रेष्ठ दान म्हणत, रायपूर येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले किशोर भगवान सिरसाट तथा रायपूर तलाठी ऑफिसला कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या सौ. किरण किशोर सिरसाट या दोघांनी १२ जून रोजी त्यांच्या देहदानाचा संकल्प करुन लग्नाचा वाढदिवस साजरा करुन मरावे परी किर्ती रुपी उरावे, या तुकारामांच्या उक्तीप्रमाणे कार्य करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. आपल्या मरणानंतरही आपल्या देहदानामुळे कुणाचा फायदा होत असेल तर ही अभिमानाची व आनंदाची गोष्ट असून आपल्याही मरणोत्तर अधिक काळ जीवंत राहता येते. आपणही दृष्टीदान व देहदान करुन अधिक काळ जीवंत राहू शकतो, हा उदांत्न हेतू डोळ्यासमोर ठेवून लग्नाचा वाढदिवस देहदानाचा संकल्प करुन साजरा करुन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

…तरच समाजापुढे नविन आदर्श निर्माण होईल!

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकजण वाढदिवस व लग्नाचा वाढदिवसाचा केक कापून त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करीत असल्यामुळे ग्रुपमधील अनेकांना इच्छा नसतांना त्यांना दोन ओळीच्या शुभेच्छा द्याव्या लागतात. परंतु वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस नेत्रदान व देहदानाचा संकल्प करुन साजरा केल्यास समाजापुढे एक नविन आदर्श निर्माण होईल, एवढे मात्र निश्चीत !