राजूर येथे वनकर्मचारी रमेश मेढे यांचे घर फोडले; 1 लाख 10 हजाराचे सोने लंपास !

345

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा (17.JUNE.2023) बोराखेडी पोस्टे.अंतर्गत असलेल्या मोताळा तालुक्यातील राजूर येथे चोरट्यांनी वनविभागात कार्यरत असलेल्या वनमजूर रमेश मेढे यांचे घर फोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागीणे असा 1 लक्ष 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज 17 जून रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

रमेश रामकृष्ण मेढे हे मोताळा वनविभागामध्ये वनमजूर म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या कुटुंबीयासोबत राजूर येथे राहतात, ते 16 जून रात्री ते गच्चीवर झोपलेले असतांना चोरट्याने या संधीचा फायदा घेत घराचे कुलूप व कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करुन घरातील नगदी 20 हजार रुपये रोख व घरातील लोखंडी पेटीतील 90 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लक्ष 10 हजाराचा माल लंपास केला आहे. अश्या वनकर्मचारी रमेश मेढे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टे.अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 380, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घुले हे करीत आहेत. राजूर येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात, तसेच येथे चोरीचे प्रमाणसुध्दा नगण्य आहे. त्यातच चोरट्याने केलेली ही चोरी व मेढे यांच्या आयुष्यभराची कमाईवर चोरट्याने डल्ला मारल्याने अज्ञात चोरट्याला पकडणे हे बोराखेडी पोलिसासमोर एक मोठे आव्हान आहे.