चिखली आगाराच्या वाहकाची इमानदारी; प्रवाशाचे राहिलेले 315 रुपये फोन पे ने परत !

582

वाहक गणेश इंगळे यांनी दिला माणूसकी जीवंत असल्याचा प्रत्येय

BNU न्यूज नेटवर्क..
चिखली (18.JUNE.2023) आजच्या कलीयुगात इमानदारी फार कमी लोकांमध्ये पहायला मिळते, अन्यथा पैसा दिसला की मोठ-मोठ्या नागरिकांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु अनेकामध्ये इमानदारी सुध्दा पहायला मिळते. अशीच इमानदारी एसटी.महामंडळाच्या चिखली डेपोचे वाहक गणेश इंगळे यांनी दाखवित प्रवाशाचे बाकी राहिलेले 315 रुपये फोन पे परत करुन आजही माणूसकी जिवंत असल्याचा दाखला दिला आहे.

बुलढाणा येथील प्रभाकर वानखडे यांना काही कामानिमित्त जालना जायचे होते. परंतु बुलढाणा येथून जालना एसटी.बस उपलब्ध नसल्याने ते 16 जून रोजी बुलढाणा येथून त्यांच्या नातेवाईक यांच्यासमवेत चिखली येथे पोहचले. चिखली येथे चिखली आगाराच्या चिखली ते शिर्डी एसटी.बस लागल्याने प्रभाकर वानखडे नातेवाईकासमवेत बसमध्ये बसले. त्यांनी चिखली येथून वाहक गणेश इंगळे यांना 500 रुपये देवून चिखली ते जालना 1 फुल 125 रुपये व एक हॉफ टिकीट 60 असे त्यांचे भाडे 185 रुपये झाले होते. परंतु पैसे सुटे नसल्याने वाहकाने पैसे नंतर देतो, असे सांगितले. वानखडे घाईगडबडमध्ये जालना येथे उतरले, तेवढ्यात एसटी.बस निघून गेली. त्यावेळी वाहकाकडे टिकीटाचे 315 रुपये बाकी राहिल्याचे वानखडे यांच्या लक्षात आले. परंतु एस.टी बस शिर्डीकडे मार्गस्थ झाली होती.

वाहक गणेश इंगळे यांचे होत आहे कौतूक..

पैसे राहिल्याने वानखडे यांनी जालना बसस्थानकात पोहचवून चिखली आगाराचे वाहक गणेश इंगळे व चालक संतोष शर्मा यांचा मोबाईल नंबर मिळवित त्यांना फोन करुन, साहेब….तुमच्याकडे टिकीटाचे 315 रुपये बाकी राहिले, असे सांगितले. वाहक गणेश इंगळे यांनी वानखडे यांना फोन पे नंबर मागवून राहिलेले 315 रुपये त्यांना फोन पे द्वारे परत करुन आजही इमानदारी जिवंत असल्याचा प्रत्येय दिल्याने, वाहक गणेश इंगळे व चालक संतोष शर्मा यांचे सर्वत्र कोतूक होत आहे.