काटी गावातही चोरटे सक्रीय; 2 मोबाईल लंपास !

340

BNU न्यूज नेटवर्क..
नांदुरा (23.JUNE.2023) मोठ्या शहरात किंवा आठवडी बाजरात मोबाईल चोरीच्या घटना होतात, परंतु आता चोरटे खेड्यागावातही सक्रीय झाले असून मलकापूर ग्रामीण पोस्टे.अंतर्गत असलेल्या नांदुरा तालुक्यातील काटी येथे दोन मोबाईल लंपास केल्याची घटना 19 जून रोजी उघडकीस आली. विजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन मलकापूर ग्रामीण पोस्टे.ला अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काटी येथील विजय उत्तमराव हिवाळे व अर्चना शांताराम तायडे यांनी मलकापूर ग्रामीण पोस्टे.ला 21 जून रोजी फिर्याद दिली. यामध्ये विजय हिवाळे यांनी म्हटले आहे की, ते 19 जूनच्या रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेले, तेथे त्यांनी रात्री 11.50 वाजेपर्यात मोबाईल पाहल्यानंतर ते झोपी गेले. सकाळी 6.30 वाजता जाग आली असता अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच अर्चना तायडे यांचा त्या सुध्दा गच्चीवर झोपलेल्या असतांना त्यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. विजय हिवाळे यांचा VIVO-Y-19 किेंमत 10 हजार तर अर्चना तायडे यांचा NARZO-50A कंपनीचा 5 हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने लंपास केल्याच्या फिर्यादीवरुन मलकापूर ग्रामीण पोस्टे.ला अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवीचे कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मोबाईल चोरटा गावातील की बाहेरील याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.