टाकळी (वा) येथील 28 वर्षीय संतोष सपकाळ पारखेड येथे अपघातामध्ये ठार !

3647

टाकळी(वा) गावावर शोककळा;भरधाव आयशरने केला घात

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (24.JUNE.2023) मोताळा तालुक्यातील टाकळी (वा) येथील पवन (उर्फ) संतोष महादेव सपकाळ हा 28 वर्षीय युवक आज शनिवार 24 जून रोजी आई रुख्मीणाबाई यांच्यासोबत आपल्या दुचाकीने गावाकडे येत होता. दरम्यान खामगाव तालुक्यातील पारखेड शिवारातील हायवे नंबर 6 वर आयशरने संतोषच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की या धडकेत संतोष हा जागीच ठार झाला तर त्याची रुख्मीणाबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. आयशर चालक वाहन घेवून सुसाट वेगाने फरार झाला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टाकळी(वाघजाळ) येथील पवन उर्फ संतोष महादेव सपकाळ (वय 28) हे आपल्या दुचाकी क्रं.एम.एच.28 बी.एच.9415 ने आई रुख्मीणाबाइ सपकाळ (वय 47) यांच्यासोबत पहुरजिरा येथून आज 24 जून रोजी घराकडे यत असतांना दुपारी 1.30 ते 1.50 वाजेच्या सुमारास त्यांना हायवे नं.6 वर जलंब पोस्टे.अंतर्गत असलेल्या पारखेड शिवारात असलेल्या भारत पेट्रोलियम पंपाजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.40 सीडी.3842 ने संतोष सपकाळ यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, संतोष हा रोडवर पडल्याने त्यांच्या डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्याने जो जागीच ठार झाला, तर त्याची आई रुख्मीणाबाई सपकाळ ह्या रोडच्या डिव्हाईडरवर आदळल्याने त्यांच्या उजवा व डाव्या पायाला तसेच कंबरेला जबर मार लागल्याने त्यांच्यावर खामगाव येथे उपचार करुन पुढील उपचारार्थ अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संतोष उर्फ पवन सपकाळ यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी असा आप्त परिवार आहे. संतोषच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वृत्तलिहेपर्यत अंबादास सपकाळ हे जलंब पोलिस स्टेशनला सदर घटनेची फिर्याद देण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे.