कामाला आलेल्या 50 वर्षीय इसमाचा धाड येथे मृत्यू !

68

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (26.JUNE.2023) मृत्यू अटळ सत्य आहे, कोणाला केंव्हा यईल, हे मात्र सांगता येत नाही. असाच एक प्रकार धाड पोस्टे.अंतर्गत असलेल्या धाड येथे २५ जून रोजी कामाला आलेल्या ५० वर्षीय बिलास कुमारला रक्ताच्या उलट्या होवून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज २६ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

बुलढाणा तालुक्यातील धाड येथे संतोष गम्मा प्रसाद हरिजनपूर ता.फरीदा जि. महाराजगण उत्तर प्रदेश यांचे सितारा बारच्या समोर कोल्ड स्टोरेज दुकान आहे. या दुकानावर बिलास कुमार (वय ५०) हा इसम मागील ३ महिन्यापासून मजुरीने काम करीत होता. बिलास कुमार हे २५ जून रात्री झोपलेले असतांना संतोष प्रसाद याला आज २६ जून रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास बिलास कुमार यास रक्ताची उलटी होवून मरण पावलेला दिसला, अशा संतोष प्रसाद यांच्या फिर्यादीवरुन धाड पोस्टे.ला आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.