BNU न्यूज नेटवर्क..
मलकापूर(17JULY.2023)भांडण-झगड्यांना कोणतेही मोठे कारण लागत नसते. छोट्या वादातून सुध्दा हाणामारीच्या घटना घडू शकतात. असाच एक प्रकार मलकापूर येथे घडला. मालकाने कामावर काढून टाकल्याचा राग अनावरण झाल्याने एकाने पुर्वीची ठिकाणी काम करणाऱ्या मालकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याने, आरोपीवर मलकापूर शहर पोस्टे.गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना 16 जुलै रोजी दुपारी 12.45 वाजता कोंडवाडा रोड मलकापूर येथे घडली होती.
नकूल जैस्वाल यांनी मलकापूर पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विजेंद्रसिंग अ.बिसेन हा जैस्वाल यांच्या श्री जिण्मा मोटर्स शोरुमवर कामाला होता. तो दारु पिऊन येत असल्यामुळे फिर्यादीने त्याला दारु पिऊन येत जाऊ नको, असे अनेकदा समजावून सांगितले होते. परंतु त्याने ऐकले नसल्याने त्याला कामावरुन काढून टाकले होते. कामावरुन काढून टाकल्यानंतर विजेंद्रसिंग बिसेन हा पाच महिन्यानंतर येवून शिवीगाळ केली होती, त्याबाबत फिर्याद सुध्दा दिली होती. परत तो 16 जुलै रोजी चांडक शाळेजवळील फिर्यादीच्या शोरुम जवळ कचरा फेकणारी गाडी घेवून येवून त्याने शिवीगाळ करीत हातात लोखंडी रॉड घेवून खाली उतरुन शिवीगाळ करीत डोक्यावर रॉड मारीत असतांना तो नकूल जैस्वाल यांनी चुकविला परंतू यामध्ये त्यांचे डावे हाताचे अंगठा व पहिले बोट फाटून अंगठा फॅक्चर झाल्याचे म्हणीत पुढच्या वेळी मारुन टाकण्याची धमकी देवून कचरा गाडी घेवून निघून गेला, अशा नकूल जैस्वाल यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विजेंद्रसिंग बिसेन याच्यावर मलकापूर शहर पोस्टे.ला भादंवीचे कलम 325, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.