विविध मागण्यांसाठी वंचितची मोताळा तहसिल कार्यालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’

56

अभ्यासू प्रशांत वाघोदेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

BNU न्यूज नेटवर्क
मोताळा( 17 JULY.2023) तालुक्यात सुरु असलेली अवैध दारु विक्री, जुगार, मटक्यावर कारवाई करण्यात यावी यासह आदी विविध प्रलंबीत मागण्यांसाठी वंचितच्यावतीने जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव सिरसाठ, तालुका महासचिव विशाल मोरे, तालुकाध्यक्ष समाधान डोंगरे यांच्या नेतृत्वात आज सोमवार 17 जुलै रोजी मोताळा तहसिल कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चा वंचितचे शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या. शिस्तबध्द पध्दतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होती.

वंचितच्या शिष्टमंडळाच्यावतीने तहसिलदरांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतंर्गत प्रलंबीत प्रकरणे मंजूर करण्यात यावी, नविन शिधापत्रिका मागणी प्रस्तावानुसार प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावीत, डॉ.बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत सिंचन विहिरी व लाभार्थ्यांच्या विहीरी वरील प्रलंबीत वीज जोडणी प्रकरणे निकाली काढण्यात यावी, बोराखेडी पोस्टे. तसेच तहसिल अंतर्गत शेत रस्त्याची प्रलंबीत असलेले प्रकरणे निकाली काढण्यात यावीत, ई-क्लास संदर्भात तहसिल कार्यालयात प्रलंबीत असलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने वन विभागाने पंचनामे करुन निकाली काढावी, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 मधील मजुराची प्रलंबीत मजुरी देवून त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, मोताळा तालुक्यातील चालू असलेले अवैध दारु, जुगार, मटक्यावर कार्यवाही करुन ते बंद करण्यात यावी, घरकूल योजनेतंर्गत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यावा, आदी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी वंचितचे महासचिव प्रशांत वाघोदे यांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखविल्याने तहसिल प्रशासनाने समस्यांचे निकारण करण्यासाठी बोलाविलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने समस्यांचे निकारण करतांना त्यांची मोठी तारांबळ उडाल्याने प्रशांत वाघोदे यांच्या अभ्यासूवृत्ती दिसून आली. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या.