शेतकऱ्यांनो चिंता नको! जिल्ह्यात पुढील तीन दिवस धो..धो..कोसळणार, धरणे तुडूंब भरणार-पंजाबराव डख

58

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (18Aug.2023) शेतकऱ्यांनो चिंतो नको, पूर्व विदर्भापासून पावसाला सुरुवात होवून एक-दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर धो…धो…कोसळणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटणार असून बुलढाणा जिल्ह्याभर 19, 20, 21 ऑगस्टला जोरदार पाऊस पडणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, मात्र पाऊस थांबणार नाही. पाऊस अजून अडीच महिने पडणार असून तो दिवाळीपर्यंत सुरु राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख(Panjabrao Dakh) यांनी धाड येथे शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना व्यक्त केला.

धाड येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पंजाबराव डख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. पुढे त्यांनी सप्टेंबर महिन्यात परिसरातील नदीनाले महाराष्ट्रातील धरणे तुंडूंब भरतील. पाऊस अडीच महिने पडणार दुष्काळ पडणार नसून शेतकऱ्यांचे शेतमालाचे नुकसान होणार नाही. पाऊस दरवर्षी वीस दिवसांनी पुढे चालतो त्यामुळेच यावर्षी 27, 28 जूनला पेरणी योग्य पाऊस पडला. 2 ते 6 डिसेंबर रोजी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. शेतकरी बांधवांनी ऊस व सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करावी. कितीही पाऊस पडला तरी ऊस हे पीक खराब होत नाही. सोयाबीन कांद्याचे नुकसान होणार नाही शेतकरी आनंदी राहील, असे पंजाबराव डख म्हणाले.