मुलगी कॉलेजातून परत नाही आली; गेली कुठे?

48

अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल!

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा(21 Aug.2023) तालुक्यातील धा.बढे पोस्टे.अंतर्गत असलेल्या एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला अज्ञात इसमाविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने धा.बढे पोस्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्या आपल्या मुलगा व मुलगी असे एकत्रीत राहतात. पतीचे सहावर्षापुर्वी निधन झाले आहे. त्यांची 16 वर्षीय मोठी मुलगी धा.बढे येथे इयत्ता 12वी मध्ये शिकत असल्याने दररोज ये-जा करते, ती 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कॉलेज गेली. फिर्यादी शेतात कामाला गेल्या होत्या, सायंकाळी 5 वाजता कामावरुन परत आल्या असता त्यांना मुलगी परत आली नसल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी गावात व नातेवाईकाकडे शोध घेतला ती मिळून आली नसल्याच्या फिर्यादीवरुन धा.बढे पोस्टे.ला अज्ञाताविरुध्द भादंवीचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.