एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यान्वीत शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

62

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (27.Sep.2023 शासकीय माहिती) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकरी लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट झाले नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. त्याऐवजी या योजनेच्या लाभार्थ्यांना धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिन्याप्रमाणे रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 23 हजार 1 लाभार्थ्यांना 1 कोटी 3 लाख 50 हजार 450 रुपये रक्कम जानेवारी ते मार्च 2023 करीता वितरीत करण्यात आली आहे. रोख रकमेचा लाभ घेण्यासाठी एपीएल लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालय किंवा रास्तभाव दुकानांमध्ये भरुन द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
000