विद्युतचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू

59

मोताळा- तालुक्यातील खरबडी येथील एक 35 वर्षीय युवक रोजंदारीने एका ठेकेदाराकडे काम करीत असतांना त्याला विद्युतचा जोरदार धक्का लागल्याने तो जागेवर कोसळला. त्याला पुढील उचारार्थ जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे नेण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मृतकाचे नाव देवसिंग लोडूसिंग सोळंके असे आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरबडी येथील देवसिंग लोडूसिंग सोळंके (वय 35) हा तरुण एका ठेकेदाराकडे विद्युत पोल उभे करणे व तार ओढण्याचे काम करीत होता. तो आज 26 सप्टेंबर रोजी खरबडी शिवारात विद्युत पोलचे काम करीत असतांना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो खाली कोसळला, त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णलयात नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सोळंके कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, बहिण, पत्नी व दोन चिमुकल्या मुली आहेत. त्याच्यावर सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास खरबडी येथे शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.