बुलढाण्यातील पोलिसांचा दिल्लीत डंका; आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत आणले बुलढाण्यात !

81

आयफोन, लॅपटॉपसह 8 लक्ष 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

BNU न्यूज नेटवर्क..
बुलढाणा (3.Oct.2023) आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सायबर गुन्हे करुन मोकळे होतात, त्यांना वाटते आपल्याला कोण पकडले ? परंतु गुन्हेगारांपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांची नेटवर्क पावरफुल्ल असल्याने त्यांनी तांत्रीक बाबी तसेच सोशल मिडीयाच्या सहाय्याने कानून के हात बहोत लंबे होते है..प्रमाणे पोलिसांनी थेट दिल्लीत डंका वाजवित तेथे मेहकर येथील नागरिकाची 62 लक्ष 69 हजाराने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन नायझेरीयन आंतराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून लॅपटॉप, आयफोनसह 8 लक्ष 80 हजाराचा मुद्देमालासह आरोपींना बुलढाण्यात घेवून आले. सदर कारवाई बुलढाणा स्थागुशा पथकाने केली.

जिल्ह्यातील मेहकर येथील दिपक शिवकराम जैताळकर यांची 23 जून 2023 रोजी फेसबूकच्या माध्यमातून एका नायजेरीयन महिलेची ओळख झाली. महिलेने लंडन येथील असल्याचे सांगत भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करीत ओळख घट्ट केली. पुढे आपला ऑनलाईन फसवणूकीचा फास टाकण्यास सुरुवात करीत 65000 ग्रेट ब्रिटीश पाऊंडचे गिफ्ट पार्सल पाठवित असल्याचे सांगून सदर पार्सल दिल्ली एअरपोर्ट इथून सोडून घेण्यासाठी जैताळकर यांना 13 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीमध्ये कस्टम क्लिअरन्स चार्जेस, पाठवलेली रक्कम भारतीय चलनात रुपांतर करण्यासाठी कन्वर्जन फी, मास्टर कार्ड पाठविण्यासाठी ज्युडीशीअल कौन्सीलकडून मंजुरी, मास्टर कार्ड अपडेट व इतर विविध प्रोसेसिंग फी भरण्याच्या नावाखाली बँकाचे खात्यामधून आरटीजीएस, चेक व फोन पे द्वारे असे 62 लक्ष 69 हजार 700 रुपये वसूल केले. परंतु गिफ्ट पार्सल न मिळाले नसल्याने फसवणूक झाल्याची बाब लक्षात येता दिपक जैताळकर यांनी बुलढाणा सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी सायबर पोस्टे.ला अप.क्र. 37/2023 भादंवीचे कलम 420, 465, 468, 470, 471 सहकलम 66 क, 66 ड माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी असा लावला शोध

सदर क्लिष्ट प्रकरणाचा छडा लावणे सायबर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. स्थागुशा पथकाने तांत्रिक बाबीचा अभ्यास करीत तक्रारदार यांनी ऑनलाईन पाठविलेल्या रकमेचे विविध बँक अकाऊंट, एटीएम फुटेज, फेसबूक अकाऊंट, ओला सर्व्हीस, पेटीएम, फोन पे, गूगल अकाउंट, गुगल पे, इंडीगो एइरलाईन, इंशोरन्स कंपनी, फ्लिपकार्ट व इतर ईकॉमर्स वेबसाईट, सोशल मिडीया प्लॅटफामवरुन माहिती प्राप्त करीत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आरोपी धंतीया, बरेली उत्तर प्रदेश, बुरारी नगर, संत नगर दिल्ली, दिमापूर नागालॅड येथे असल्याचे व ते वापर करीत असलेल्या सिमकार्ड व मोबाईल नंबर वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असल्याचे तांत्रिक विश्लेषण करीत तांत्रीक बाबीचा मागोवा घेत दिल्ली येथे निजोस फ्रँक (वय 30) व अलाई विन्संट (वय 32) दोन्ही रा.संत नगर बुरारी दिल्ली मुळ नायजेरीयन यांना मोठा शिताफीने अटक करीत दिल्लीत पोलिसांनी डंका वाजविला आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

बुलढाणा पोलिसांनी निजोस फ्रँक व अलाई विन्संट यांना अटक करुन त्यांच्याकडून ॲपल लॅटटॉप 2, राऊटर 3, आयफोन मोबाईल 3, इतर मोबाईल 12 , अेटीएम 15, बँक पासबूक 3 असा एकूण 4 लक्ष 30 हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच बँकेत ठेवलेली रक्कम 4 लक्ष 50 हजार असा एकूण 8 लक्ष 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई

सदर कारवाई जिल्हा पेालिस अधिक्षक , अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक विलासकुमार सानप, पोहेकाँ. ज्ञानेश नागरे, पोना.दिपक जाधव, पोकाँ.गजानन गोरले, स्थागुशा पोकाँ. ऋषीकेश खंडेराव, तांत्रीक विश्लेषण पथकाचे पोहेकाँ.राजु आडवे, पोकाँ.कैलास ठोंबरे, पोकाँ.अमोल तरमळे यांच्या पथकाने केली.

अशी आहे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पध्दत

फेसबुकवरुन भारतीय महिला व पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांची मैत्री करीत भावनिक नाते निर्माण करीत व्हर्च्युअल नंबर खरेदी करुन विदेशातून बोलत असल्याचे सांगतात. फेसबूक व व्हॉटसअपच्या माध्यमातून चॅटींग करुन प्रेमाच्या मायाजाळात फसवित ऑनलाईन फसवणूकीला सुरुवात करतात. नागरिकांनी सोशल मिडीयाच्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, अज्ञात इसमाचा व्हॉटसअपचा व्हीडीओ कॉल उचलू नये, कोणाच्याही सांगण्यावरुन पैसै पाठविण्याचे व्यवहार करु नये, असे आवाहन बुलढाणा पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.