407 व एसटी.बसची भिषण धडक ; 1 ठार

83

खामगाव-पिं.राजा रोडवरील घटना !

खामगाव-(27 Oct.2023)पिंपळगाव राजा खामगाव रोडवर राहुड शिवारात तांदुळवाडी फाट्यानजीक शुक्रवार 27 ऑक्टोबरच्या रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एसटी.बस व 407 वाहनाची धडक झाली. या धडकेत 407 वाहन चालक नयुम शहा कयुम शहा या 25 वर्षीय युवकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरुन पिं.राजा पोस्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला.

खामगाव आगारातील चालक अरविंद दामोदर यांनी पिंपळगाव राजा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खामगाव आगाराची एसटी.बस क्र. एम.एच.06-एस.8256 मध्ये बिघाड झाल्याने त्या बसला फिर्यादी व मॅकनीक एसटी.बस क्र.एम.एच.-40 अेक्यू-6130 च्या सहाय्याने पिंपळगाव राजा कडून खामगावकडे घेवून जात असतांना 27 ऑक्टोबरच्या रात्री 12.30 वाजेच्या सुमारास 407 वाहन क्र.एम.एच.04-डी.एस-8855 चालक नईम शहा कयुम शहा राजूर ता.मोताळा याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून खामगाव पिंपळगाव राजा मुख्य रस्त्यावर तांदुळवाडी फाट्यानजीक राहुड शिवारात एस.टी.बसला चालक बाजुला धडक दिली. या धडकेत बस चालक व मॅकेनीक जखमी झाले तर खाजगी वाहन चालक नयुम कयुम शहा यांचा मृत्यू झाला. बसचे 45 हजाराचे नुकसान झाल्याच्या फिर्यादीवरुन पिंपळगाव राजा पोस्टे.ला मृतक खाजगी वाहन चालकाविरोधात भादंवी.चे कलम 304-अ, 279, 337, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार गजानन सातव हे करीत आहेत.

विटांचे 407 वाहन नयुम शहा कयुम शहा हा खामगावकडून घरी घेवून येत असतांना 27 ऑक्टोबरच्या रात्री 12.30 वाजेच्या सुमारास एसटी.बस व वाहनाची धडक होवून यामध्ये नयुम शहा यांचा दुदैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडिल व लहान भाऊ, पत्नी असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शहा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.