धा-बढे रोहिणखेड रस्त्यावर दुचाकीचा अपघात; 1 ठार, दोन गंभीर जखमी

91

BNU न्यूज नेटवर्क..
मोताळा-(26 NOV.2023) तालुक्यातील धा.बढे-रोहिणखेड रोडवर दुचाकीचा भिषण अपघात होवून यामध्ये 1 जण जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास 14 गाव पाणी पुरवठा योजनेच्या वाकानातील पाण्याच्या टाकीजवळ घडला. जखमींना रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी क्र.एमएच.28 बीएन-9629 ने तीन युवक मलकापूरकडून वाघजाळ फाट्याकडून सोनबरड येथे जातांना धा.बढे रोहिणखेड रोडवरील 14 गाव पाणी पुरवठा योजना टाकीजवळ दुचाकी स्लीप होवून भिषण अपघात घडला, यामध्ये 29 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याचे नाव समजु शकले नाही. तर घुस्सर येथील वानखडे व एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच धा.बढे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.