एक पाऊल माणुसकीचे; आपली छोटीशी मदत प्रतिक बोराडेचा जीव वाचवू शकते !

63

मोताळा-(22 NOV 2023) शहरातील प्रभाग क्र.16 मधील 18 वर्षीय प्रतिक दिपक बोराडे याचा बोराखेडी फाट्याजवळ 19 नोव्हेंबर रोजी अपघात होवून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील जे.जे.प्लस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. पुढील उपचारासाठी 8 ते 9 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे.

आई-वडिलांची आर्थिक परिस्थीती नाजूक असल्याने त्यांना एवढा खर्च झेपवणारा नाही. सुखात तर सर्वच सहभागी होतात, परंतु कोणाच्या दु:खात सहभागी होण्याचा आनंद मोठा वेगळाच असतो. प्रतिक बोराडे याच्या उपचारासाठी आपल्या सढळ मदतीची गरज आहे. आपण आपली मदत फोनपे नंबर 7350605538 किंवा दिलेल्या स्कॅनरवर पैसे पाठवून प्रतिकचा जीव वाचवू शकता.