लोकसभा निवडणूक 2024 पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडून आढावा

63

बुलढाणा-(शासकीय बातमी 8 डिसेंबर )भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक कालावधीमध्ये कामकाज करण्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आली आहेत.

निवडणूक कालावधीमध्ये करावयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच इतर नियुक्त नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सर्व नियुक्त नोडल अधिकारी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नोडल अधिका-यांना सोपविण्यात आलेल्या कामकाजाबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिल्या.